शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यासाठी आणि त्यांचे अर्ज घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल बनवले आहे. महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आणि अशा विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळतो.
ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी सिंचन अशा योजनांसाठी अर्ज केला आहे, त्यांची सोडत लागली आहे. आता या शेतकऱ्यांनी पुढील कारवाईसाठी त्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करायचे आहेत. या कागदपत्रांमध्ये शेतीचा सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड बँक पासबुक, आणि इतर आवश्यक कागदपत्रे असू शकतात.
शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर महाडीबीटी पोर्टलवर कृषी सिंचन, कृषी यांत्रिकीकरण असे योजनेसाठी अर्ज केला असेल, आणि तुमचे ऑनलाइन सोडतीत नाव आले असेल, तर तुम्हाला क कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे
१. महाडीबीटी च्या वेबसाईट वर शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी अर्ज करता येतो.
२. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते.
३. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे या वेबसाईटवर अपलोड करायचे असतात.