श्रमयोगी मानधन योजना काय आहे
श्रम योगी मानधन योजना केंद्र सरकारने चालू केलेली एक पेन्शन योजना आहे. यामध्ये तुम्हाला साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन खात्रीने ती दिली जाते.
आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. हे लोक आयुष्यभर कष्ट करून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात. परंतु उतारवयात त्यांना त्यांच्या मुलावर अवलंबून राहावे लागते. काही लोकांना उतारवयात त्यांची मुलेही संभाळत नाहीत अशा वेळी आयुष्यभर कष्ट करून स्वतःचे आयुष्य स्वहिमतीने जगून सुद्धा वृद्ध पण आल्यावर त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते
श्रम योगी मानधन योजना या योजनांमध्ये तुम्ही महिन्याला काही ठराविक रक्कम भरता, आणि तेवढीच रक्कम तुमच्या साठी केंद्र सरकार भरत असते. तुम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत ही थोडी थोडी रक्कम भरून तुमचे वृद्ध पणातील दिवस सुरक्षित करू शकता. वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला त्याच बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते.
श्रम योगी मानधन योजना साठी पात्रता काय आहे.
१. भारतीय नागरिक असावा.
२. वयाचे चाळीस वर्षाच्या आत ही योजना चालू करता येते.
३. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला वयानुसार ठराविक रक्कम भरावी लागते.
Shramyogi mandhan Yojana
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा