सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकार राबवत असलेली महत्वकांशी योजना आहे. यामध्ये मुलींच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी रक्कम साठवली जाते, आणि तिचे वय पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 21 वर्षानंतर सर्व रक्कम व्याजासहित एक मोठी रक्कम बनवून दिली जाते. इतर योजनांपेक्षा या योजनेमध्ये व्याजदर सर्वात जास्त मिळते त्यामुळे मिळणारा परतावा ही जास्त असतो.
सुकन्या समृद्धी योजना चालू कशी करावी?
सुकन्या समृद्धी योजना चे खाते तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडू शकता. नावाप्रमाणेच ही योजना फक्त मुलींसाठी आहे शून्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना या योजनेमध्ये सहभाग मिळतो. या योजनेची सुरुवात फक्त अडीचशे रुपये या छोट्याशा रकमेने करता येते. तुम्ही जास्तीत जास्त या योजनेमध्ये वर्षाला दीड लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेची मर्यादा 15 वर्ष पर्यंत आहे. ते पंधरा वर्ष संपल्यानंतर मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत रक्कम भरण्याची गरज नसते. यामध्ये व्याज रूपात रक्कम टाकली जाते. या योजनेला व्याज दरही चांगले असल्यान आणि चक्रवाढ व्याज मिळत असल्याने त्यामध्ये बनणारे रक्कम मोठी असते, त्यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित करता येते. त्यांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी येणारे मोठे खर्च तुम्ही सहज करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना चे काही लक्षणीय फायदे
१. सुकन्या समृद्धी योजना चालू करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागत नाही, फक्त २५०/- रुपयांनी खाते सुरु करता येते त्यामुळे गरीब लोकही या योजनेत त्यांच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकतात.
२. सुकन्या समृद्धी योजना लाभ व्याजदर ही चांगले मिळत.7.60% एवढे व्याजदर मिळते.
३. या योजनेमध्ये व्याजाला व्याज लागत असल्याने, मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम ही मोठी असते.