माझी कन्या भाग्यश्री योजनेचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.

 


माझी कन्या भाग्यश्री योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. या पोस्टमध्ये आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे, पात्रता आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज करण्याची पद्धत याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाने एक मुलगी किंवा दोन मुली नंतर कुटुंब नियोजन केले आहे त्या कुटुंबांना माझी कन्या भाग्यश्री योजना ही खूप लाभदायक योजना आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाखापर्यंत आहे ते कुटुंब या योजनेसाठी पात्र आहे. चला तर या योजनेच्या अटी व शर्ती जाणून घेऊया. 

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता.


1. दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी अथवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

2. एका मुलीनंतर मातापित्यांनी कुटुंब नियोजन केल्यास त्यांना  पन्नास हजार रुपये एवढी रक्कम अनुज्ञेय राहील.

3. दोन मुली नंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्यांना रुपये 25 हजार एवढी रक्कम अनुज्ञेय राहील.

3. दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर मुलीचा जन्म झाल्यास परंतु दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुली योजनेच्या लाभास पात्र राहतील.

4. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी आवश्यक कागदपत्रे

  1. मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक जन्मतारखेचा दाखला
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. रेशन कार्ड
  4. मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असल्याबाबतची सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
  5. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी किंवा संस्थेचे प्रमाणपत्र.
  6. लाभार्थी मुलीचे आधार कार्ड

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका, आणि आशा सेविका यांची मदत घेऊ शकता. त्यात तुम्हाला या योजनेचे फायदे पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्वांविषयी मार्गदर्शन करू शकतात.Post a Comment

Previous Post Next Post