जनधन योजना अंतर्गत बँक अकाऊंट उघडल्यामुळे मिळतात अनेक फायदे, वाचा सविस्तर माहिती.

 


पंतप्रधान जनधन योजना ही सर्वसामान्य जनतेला बँकींग सुविधेचा लाभ होण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले आहे. पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत भारतीय नागरिक कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत शून्य रुपयांमध्ये सेविंग खाते उघडू शकते. या योजनेअंतर्गत बँक खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची सक्ती नसते, तसेच डेबिट कार्ड, चेक बुक, ओवरड्राफ्ट, आणि विमा अशा इतर सुविधांचाही लाभ मिळतो.

प्रधान जनधन योजनेमध्ये सहभागी कसे होता येते?.

पंतप्रधान जनधन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी आणि या योजनेचे फायदे घेण्यासाठी तुम्ही जनधन योजने अंतर्गत कोणतीही राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडू शकता. तसेच तुमच्या अगोदरच बँक खाते असेल तर त्या खात्याची जनधन खात्यात रूपांतर करू शकता.

आवश्यक कागदपत्रे.

जनधन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स दोन फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात. हे खाते तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडू शकता.


जनधन योजनेचे महत्त्वाचे लाभ

१. जनधन योजने अंतर्गत तुम्ही शून्य रुपयाने सेविंग खाते उघडू शकता.
२. जनधन योजने अंतर्गत बँक खाते उघडल्यामुळे तुम्हाला सर्व बँकिंग सुविधांचा लाभ मिळतो. जसे की डेबिट कार्ड, चेक बुक आणि ओवरड्राफ्ट या महत्वाच्या सुविधांचा लाभ मिळतो.
३. जनधन योजने अंतर्गत बँक अकाऊट घडल्याने तुम्हाला बँक खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची सक्ती नसते. ही तर बँक खात्यामध्ये किमान रक्कम ठेवावी लागते न ठेवल्यास दंड आकारला जातो. 
४. जनधन योजना अंतर्गत बँक खाते धारकांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो.
५. जनधन योजने अंतर्गत बँक खाते धारकांना तीस हजार रुपयांचा लाईफ कव्हर मिळतो.
६. जनधन योजना अंतर्गत तुम्ही दहा हजार रुपये पर्यंत कर्ज मिळवू शकता. तुमच्या बँक खात्यामध्ये 0 रुपये रक्कम असली तरी तुम्हाला दहा हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇

Post a Comment

Previous Post Next Post