कृषी सिंचन योजनेत 80 टक्के अनुदान, कोणाला मिळणार लाभ काय आहेत फायदे जाणून घ्या

 


पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने पाण्याचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार राबवत आहे. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की ही योजना 2025-26 पर्यंत चालू राहणार आहे. 


पंतप्रधान सिंचन योजना मध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे मुख्य दोन सिंचन प्रकार आहेत. ठिबक सिंचना मध्ये विशिष्ट पद्धतीने थेंबाथेंबाने पिकाला दिले जाते, त्यामुळे शेती पूरक आला योग्य प्रमाणात पाणी मिळून पिके जोमाने वाढतात आणि उत्पादन वाढते. त्याच प्रकारे तुषार सिंचन प्रकारांमध्ये पावसासारखे फवाऱ्याने शेती पिकाला पाणी दिले जाते, त्यामुळे ज्या पिकांना जास्त पाण्याची गरज असते त्यांनाही योग्य प्रमाणात पाणी मिळून उत्पादन वाढते.

ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन शेतामध्ये जोडण्यास सरकार अनुदान किती देते.

पंतप्रधान सिंचन योजना मध्ये 80 टक्के अनुदान मिळत आहे. त्यामुळे सामान्य शेतकरीही त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन बसवू शकतात.


या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ फक्त शेतकरी घेऊ शकतात. ज्या व्यक्तीच्या नावे शेतीचा सातबारा असतो फक्त तीच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. शेतकरी लहान असो किंवा मोठा या योजनेसाठी अर्ज करू शकतो. आणि सरकारचे अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.








Post a Comment

Previous Post Next Post