शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या दिनांक 1 जानेवारी 2022 दुपारी साडेबारा वाजता जमा होईल असे सरकारने जाहीर केले आहे. परंतु पी एम किसान केवायसी करणे शेतकऱ्यांवर बंधनकारक आहे. या पोस्टमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख पाहणार आहोत.
सरकारने जाहीर केले आहे की, पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी यांना आधार कार्ड ई केवायसी करायची आहे. ही केवायसी करायची शेवटची मुदत दिनांक 31 मार्च 2022 आहे या तारखे अगोदर सर्व शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड केवायसी करणे बंधनकारक आहे.