पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार?
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता कधी जमा होणार या प्रश्नामध्ये अडकले आहेत. पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2022 या दिवशी जमा होणार आहे. सरकारने पी एम किसान योजनेची केवायसी करणे जाहीर केल्यानंतर पी एम किसान योजनेचा दहावा हप्त कधी येईल की आतुरता प्रत्येकाच्या मनात आहे. पी एम किसान योजनेचा हा पुढील हप्ता तुम्हाला मिळेल की नाही हे ही चेक करता येते. सरकारने पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता येणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची?
स्टेप 1. सर्वात पहिल्यांदा तुम्ही पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर www.pmkisan.gov.in वर जावा.
स्टेप 2 या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर या ऑप्शन मध्ये बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3. आता राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉग, आणि गाव निवडा, तुम्ही जे गाव निवडणार आहात ते तुमची शेती जिथे आहे ते निवडा.
स्टेप 4. आता तुमच्या समोर पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांची लिस्ट दिसेल यामध्ये तुमचे नाव शोधा. यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता दिनांक 1 जानेवारी 2022 ला जमा होईल.
पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे पाहण्यासाठी 👉 - beneficiary list
सर्व सरकारी योजनांची माहिती 👉- माझी योजना www.MajhiYojana.in
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👉