PM किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा हप्ता दिनांक 1 जानेवारी 2022 ला जमा होणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2022 ला दुपारी साडेबारा वाजत हा हप्ता शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये थेट जमा होण्यास सुरुवात होईल. आपल्या देशाचे सुमारे दहा हजर कोटी शेतकरी यांना सुमारे वीस हजार कोटी रुपये वितरित केले जातील.
पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत म्हणून दिले जाते. पी एम किसान योजनेचा हा दहावा हप्ता शेतकऱ्यांना उद्या दिनांक 1 जानेवारी 2022 दुपारी साडेबारा वाजता जमा होणार आहे.