शेतीचा सातबारा खाते उतारा ऑनलाइन कसा काढावा?
सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये डिजिटल सातबारा असे सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in ही वेबसाईट येते.
या वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुमची प्रोफाईल बनवावे लागते यासाठी तुम्ही new user registration वर क्लिक करावे.
आता तुम्हाला नवीन विंडो ओपन होते ते तुमची सर्व माहिती भरून तुम्ही तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता.
शासकीय नियमानुसार तुम्हाला प्रत्येक उताऱ्याचे पंधरा रुपये भरावे लागतात. यासाठी तुम्हाला अगोदर रिचार्ज करावा लागतो. रिचार्ज करून तुम्ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे इथून काढू शकता.
शेतीचा सातबारा आणि खाते उतारा ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Tags
Farmer schemes