आनंदाची बातमी, गाई म्हशी, शेळीपालन, आणि कुक्कुट पालन योजनांसाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे आता कागदपत्र अपलोड करा.

 


महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेती आधारित पशुपलन उद्योगासाठी दुधाळ गाई म्हशी पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन योजनांसाठी दिनांक 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले जात होते. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज भरले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांची आता निवड झालेले आहे. या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन सर्व कागदपत्रे भरावयाची आहेत. आणि अर्ज आणि ही सर्व कागदपत्रे जवळच्या पशुसंवर्धन कार्यालय मध्ये जमा करायचे आहेत.

ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली आहे. त्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर मेसेज आला आहे. या शेतकऱ्यांनी शासनाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले प्रोफाइल लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

पशुसंवर्धन विभाग अधिकृत वेबसाईट

https//ah.mahabms.com


शेतकऱ्याने या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर त्यांना कोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत याची माहिती कळते. शेतकरी त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, खाते उतारा, रेशनिंग कार्ड, दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला, जातीचा दाखला या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत ते सर्व ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि त्याची प्रत जवळील पशुसंवर्धन कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post