Public Providend fund : पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) काय आहे? जनसामान्य लोकांना याचा फायदा कसा होतो.



 नमस्कार, आज आपण सरकारच्या महत्वाच्या बचत योजनेची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण अनेक वेळा PF हा शब्द नोकरदार वर्गांकडून ऐकला असेल. PF म्हणजे प्रोव्हिडंड फंड ही एक सरकारी बचत योजना आहे, ज्यामध्ये थोडी थोडी बचत केली जाते आणि काही वर्षानंतर मोठा फंड (निधी) तयार होतो. 

PF चे दोन प्रकार आहेत. 

  1.  EPF (Employee Provident Fun) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी  
  2. PPF (Public Provident Fund) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
पहिला प्रकार (EPF) हा नोकरदार व्यक्तींसाठी आहे, तर दुसरा प्रकार (PPF) हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. मित्रांनो आज आपण या PPF (Public Provident Fund) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या बचत योजनेची माहिती घेणार आहोत. 

PPF - पब्लिक प्रोव्हिडंड फंड काय आहे? 

पब्लिक प्रोव्हिडंड फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी बचत योजना आहे. ज्यामध्ये जनसामान्य व्यक्ती म्हणजेच कोणीही भारतीय नागरिक या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. हे दीर्घकालीन बचत योजना 15 वर्षांसाठी असते. यामध्ये तुम्ही वर्षाला एकदा किंवा प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम भरता. पंधरा वर्षानंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला सर्व रक्कम व्याजासहित परत मिळते. यावर कोणताही कर ही आकारला जात नाही. पीएफ या बचत योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. त्यामुळे मुदत संपल्यावर मोठा निधी तयार होतो.

महत्त्वाचे मुद्दे 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) या योजनेमध्ये भारतातील कोणतीही व्यक्ती ज्याचे वय वर्ष 18 वर्षे पूर्ण आहे ती व्यक्ती या योजनेत सहभाग देऊ शकते.

पी पी एफ ही बचत योजना आहे, या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पंधरा वर्षाचा असतो. पंधरा वर्षानंतर तुम्हाला तुमची रक्कम व्याजासहित परत मिळते.

पी पी एफ ज्या बचत योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज मिळते.
मिळणाऱ्या व्याजावर आणि गुंतवलेल्या रकमेवर ही सरकार कर आकारत नाही. त्यामुळे मोठा निधी तयार होतो.


पी पी एफ या बचत योजने मध्ये तुम्ही किमान पाचशे रुपये ते कमाल दीड लाख रुपये वार्षिक गुंतवू शकता.

पीपीएफ मध्ये गुंतवणूक एकरकमी किंवा बारा समान हप्त्यांमध्ये जमा करता येते.

मित्रांनो वरील माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून ती माहिती त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल.

धन्यवाद!

Post a Comment

Previous Post Next Post