नमस्कार मित्रांनो, आज आपण पोस्टाच्या एका महत्त्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो. तुम्ही या योजनेत थोडी थोडी गुंतवणूक करून लखपती होऊ शकता.
भविष्यातील मोठ्या खर्चाच्या जबाबदारी साठी आपल्याला अगोदरच नियोजन करावे लागते. पोस्टाची ही योजना यासाठीच आहे. या योजनेला पब्लिक प्रोविडेंट फंड असे म्हणतात म्हणजेच मराठीमध्ये भविष्य निर्वाह निधी. कमवते लोक त्यांच्या पगारातून थोडी थोडी रक्कम दर महिन्याला यामध्ये जमा करतात ही रक्कम 7.1 टक्के व्याजाने वाढत जाते आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर संपूर्ण रक्कम व्याजासहित मिळते.
इतर गुंतवणूक योजना मध्ये गुंतवणूकदाराला सरकारला कर द्यावा लागतो परंतु पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या गुंतवणूक योजनेत तुम्हाला सरकारला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे संपूर्ण रक्कम करमुक्त असते आणि परतावा जास्त प्रमाणात मिळतो.