नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण योजनेचे फायदे जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाने सर्व श्रमिक लोकांसाठी हे श्रम कार्ड आणले आहे. यामुळे श्रमिक लोकांचा सर्व डेटाबेस शासनाकडे गोळा होत आहे. या डेटाबेस चा उपयोग सरकारला त्यांच्यासाठी विविध सरकार योजना आणण्यासाठी आणि त्याची कार्यवाही करण्यासाठी होणार आहे. श्रम कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणारे सर्व कामगार काढू शकतात. श्रम कार्ड स्वतः किंवा कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन काढता येते.
श्रम कार्ड योजनेचे फायदे?
श्रम कार्ड काढल्यामुळे तुमची सर्व माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालय मध जमा होते त्यामुळे श्रमिकांसाठी सरकार योजना भविष्यामध्ये आणल्या जाऊ शकतात. आणि त्याची अंमलबजावणी सुरळीतपणे होऊ शकते.
श्रम कार्ड काढल्यानंतर कामगारांना दोन लाख रुपयांचा विमा पहिल्या वर्षासाठी मोफत दिला जातो यानंतर वर्षाला फक्त बारा रुपये कपात करून या विम्याचा लाभ आयुष्यभर घेता येतो.
कामगार ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यामध्ये प्रगती करण्याची संधी श्रम कार्डमुळे मिळते.
शासन कामगारांच्या कार्यक्षमतेचा मागोवा घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल.
श्रम कार्ड मुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षितेचा आणि सरकारी योजनांचा लाभ थेट घेता येईल.