भारत सरकारने देशातील सर्व कामगारांसाठी श्रम कार्ड योजना आणली आहे. देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे सर्व श्रमिक आपले श्रम कार्ड बनवून घेऊ शकतात. शासनाने आणलेल्या कल्याणकारी योजना श्रमिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी श्रम कार्ड योजना सुरू केली आहे.
श्रम कार्ड कोण बनवू शकते?
देशातील सर्व लोक जे विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत ते सर्व लोक श्रम कार्ड बनवू शकतात. खाली काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे आपल्याला अजून स्पष्टता येईल.
आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक श्रमिक आहेत. जसे की शेतामध्ये काम करणारे शेतमजुर, घर काम करणाऱ्या महिला, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते, बांधकाम कामगार, पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, लोहार कामगार, न्हावी कामगार, अशा प्रकारे सर्व प्रकारचे कामगार श्रम कार्ड काढू शकतात.
श्रम कार्ड कोण काढू शकत नाही.
सरकारी नोकरदार आणि जे नोकर वर्गाचा प्रॉव्हिडंट फंड जमा होतो. आणि जे लोक income tax भरतात. ते श्रमिक नाहीत म्हणून ते लोक श्रम कार्ड काढू शकत नाहीत.