मजुरांसाठी सरकारची पेन्शन योजना उतारवयात मिळणार 3000/- रुपये पेन्शन नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने मजुरांसाठी पेन्शन योजना आणली आहे यामध्ये प्रत्येक मजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या खूप आहे यांना उतारवयात खूप आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते या गोष्टीचा विचार करून त्यांच्यासाठी तीन हजार रुपये पेन्शन मिळेल अशी योजना बनवली गेली त्या योजनेचे नाव आहे श्रमयोगी मानधन योजना.


श्रमयोगी मानधन योजना

महत्त्वाचे मुद्दे

श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत सर्व मजूर जे विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते सर्व या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.

ज्या लोकांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रूपये पेक्षा कमी असते त्यांना श्रम योगी मानधन योजना चालू करता येते.

योगी मानधन योजनेमध्ये लाभार्थ्याला साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळते.

श्रमयोगी मानधन योजना लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला पन्नास रुपये ते दोनशे रुपये एवढी वयानुसार रक्कम या योजनेत जमा करावी लागते. तुम्ही जेवढी रक्कम जमा करता तेवढीच रक्कम सरकारही तुमच्यासाठी जमा करत असते. वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्हाला ही छोटीशी रक्कम गुंतवावी लागते.


श्रमयोगी मानधन योजना चालू कशी करावी. 

श्रमयोगी मानधन योजना तुम्ही जवळच्या महा-ई-सेवा केंद्रांमध्ये जाऊन चालू करू शकता. किंवा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकता.

श्रम योगी मानधन योजनेची वेबसाईट खाली दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post