Shram Yogi Mandhan Yojana या योजनेमध्ये छोटीशी गुंतवणूक केल्यास म्हातारपणी तीन हजार रुपये पेन्शन खात्रीने मिळते.

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजने विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शासन जनतेचे जीवन अधिक सुखमय होण्यासाठी विचाराधीन असते आणि त्यांच्यासाठी विविध योजना आणत असते. पीएम श्रमयोगी मानधन योजना ही अशीच एक योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन महिन्याला खात्रीने दिली जाते. ज्या बँक खात्यामधून तुमची मासिक हप्त्याची रक्कम कपात होते त्याच बँकेमध्ये तुमची तीन हजार रुपये पेन्शन तर महिन्याला जमा होते. चला तर शासनाच्या कल्याणकारी योजनेविषयी सर्व काही जाणून घेऊया.




श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काय पात्रता आहे.?

१. श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२. श्रम योगी मानधन योजना ही गुंतवणूक योजना असल्याने तुम्हाला दर महिन्याला रुपये पन्नास ते दोनशे रुपये एवढी रक्कम या योजनेमध्ये दर महिन्याला गुंतवावी लागते.

३. श्रम योगी मानधन योजनेमध्ये वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन खात्रीने दिली जाते. 

4. श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट ही 18 वर्षे ते 40 वर्षे ही आहे


श्रमयोगी मानधन योजना मध्ये सहभागी कसे होता येते? 

श्रमयोगी मानधन योजना मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही स्वतः किंवा कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.

श्रमयोगी मानधन योजनेची ऑफिशिअल वेबसाईट खाली दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या योजनेविषयी इतर माहिती जाणून घेऊ शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता.



👇

👇



श्रम योगी मानधन योजना ऑफिशियल वेबसाइट

👇
👇




श्रमयोगी मानधन योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.

तुमचं जवळचे कॉमन सर्विस सेंटर शोधण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमच्या जवळचे कॉमन सर्विस सेंटर शोधू शकता आणि तिथे जाऊन तुमची नोंदणी करू शकता.




Post a Comment

Previous Post Next Post