सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे?
सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी असते. या योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत ही आहे.
सुकन्या समृद्धी योजना खाते कोठे उघडता येते?
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतात. काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ही सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते.
सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये किती रुपये गुंतवले जातात ?
सुकन्या समृद्धी योजना चे खाते 250 रुपये एवढे डिपॉझिट करून उघडता येते. सुकन्या समृद्धी योजना तुम्ही वर्षाला कमीत २५०/- रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.
सुकन्या समृद्धी योजना पैसे कधी मिळतात.
सुकन्या समृद्धी योजना मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर मॅच्युरिटी होते. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षांनंतर मुलीला सर्व व्याजासहित रक्कम मिळते. या योजनेवर सरकार कर आकारत नाही त्यामुळे मिळणारी रक्कम ही मोठी असते. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते.