सुकन्या समृद्धी योजनेची खाते कसे उघडावे.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कुटुंबातील दोन मुलींसाठी उघडता येते. मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत हे खाते उघडता येते. तिचे पालक मुलीच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिस यामध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेची खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजना खाते अडीचशे रुपये भरून सुरू करता येते. मुलगी 21 वर्षानंतर ही योजना संपुष्टात येते आणि मुलीला सर्व रक्कम व्याजासह परत मिळते. सुकन्या समृद्धी योजना वर सरकार 7.6 टक्के दराने व्याज देते. सुकण्या समृद्धी योजना मध्ये वर्षाला कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात. सुकन्या समृद्धी योजनेचा गुंतवणूकीवर सरकार कोणत्याही प्रकारचा कर आकारत नाही. सुकन्या समृद्धी योजना वर चक्रवाढ व्याज जमा होत असल्याने मिळणारी रक्कम मोठी असते.