श्रम कार्ड नक्की आहे तरी काय आणि कशासाठी बनवायचे? नमस्कार मित्रांनो, आपल्या केंद्र सरकारने देशातील सर्व श्रमिक लोकांसाठी एक योजना आणली या योजनेअंतर्गत देशातील सर्व श्रमिकांचे रेकॉर्ड आणि डेटाबेस बनवण्यात येत आहे त्याला ई श्रम कार्ड असे म्हणण्यात येते. हा डेटाबेस किंवा रेकॉर्ड बनवण्यात येत आहे कारण या श्रमिक किंवा मजूर लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यासाठी सरकारी योजना आखण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी सरकारला या श्रमिक लोकांची माहिती असावी. या अगोदर शासनाकडे या मजूर किंवा श्रमिक लोकांची माहिती नव्हती परंतु श्रम कार्ड बनवल्याने शासनाकडे श्रमिकाची सर्व माहिती जाते त्यामुळे श्रमिकांसाठी सरकार योजना करू शकते आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करू शकते.


श्रम कार्ड कोणासाठी आहे?

श्रम कार्ड हे देशातील सर्व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी आहे. उदाहरणार्थ. शेतीमध्ये काम करणारे शेतमजूर, फेरीवाले, रस्त्यावर बसणारे विक्रेते, लोहार काम करणारे, सुतार काम करणारे, सलून व्यवसाय करणारे , वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मजूर,  अशाप्रकारे सर्व श्रमिकांचा यामध्ये समावेश होतो.


श्रम कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत.

श्रम कार्ड बनवल्याने सरकारने आखलेल्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. श्रम कार्ड बनवल्याने श्रमिकांचा सर्व डेटाबेस सरकारकडे जातोय या डेटाबेस द्वारे सरकारला श्रमिकांच्या विकासासाठी सरकारी योजना आखता येणार आहेत. 
Post a Comment

Previous Post Next Post