पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काय आहे? ही आहे महत्त्वाची माहिती

 


नमस्कार, देशातील सर्वसामान्य लोकांना विमा संरक्षणाचा लाभ घेता यावा या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 2015 मध्ये चालू केली. या योजनांमध्ये वय वर्ष 18 ते 50 या वयोगटातील सर्व लोकांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. या योजनेमध्ये विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास दोन लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती कोलमडते यासाठी खूप लाभदायक आहे. 

पंतप्रधान जीवन ज्योती विम योजना काय आहे?

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत वय वर्ष अठरा ते पन्नास या वयोगटातील सर्व लोकांना वार्षिक दोन लाख रुपयांची विमा संरक्षण मिळते. यासाठी विमाधारकाला वार्षिक तीनशे रुपये भरावे लागतात. 

आपल्या देशातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये योजना चालू करता येते. तसेच पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत बँकेमध्ये सेविंग खाते उघडल्यास योजना आपोआप चालू केली जाते. एल आय सी सुद्धा पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ग्राहकांना देत आहे. Post a Comment

Previous Post Next Post