नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये पाण्याचा
योग्य वापर होऊन पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकार शेतकर्यांना ठिबक
बसवण्यासाठी ८०% अनुदान देत आहे. सध्या ज्या शेतकर्यांना ठिबक सिंचनाच्या
ओंनलाइन सोडतीमध्ये निवड झाली आहे . त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर कागदपत्र अपलोड करायची आहेत. जर शेतकर्यांनी विहित मुदतीसाठी
जर कागदपत्र अपलोड केली नाहीत तर त्याचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत . म्हणून शेतकर्यांनी
अर्ज रद्द होण्या अगोदर कागदपत्र अपलोड करायची आहेत . शेतकर्यांना पुढील
कागदपत्रे अपलोड करावी लागतात .
1) अर्जामध्ये नमूद केलेले खाते उतारा (डीजिटल) स्वरुपात
किव्हा तलाठी याची स्वाक्षरी असलेला
2) अर्जामध्ये नमूद केलेला सातबारा (डीजिटल) किंवा तलाठी
स्वाक्षरी असलेला .
3) विहीर किंव्हा पाणी स्तोत्र असलेला सातबारा किंव्हा लाइटबील
किंव्हा पाणी परवाना हे इतर कागदपत्र मध्ये upload करावे .
4) आधारकार्ड आणि बँक पासबुक हे इतर कागदपत्र मध्ये upload
करावी .
अशाप्रकारे शेतकरी मित्रानो तुमचे ठिबक साठी
अनुदान मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची निवड झाल्यास लवकरात लवकर कागदपत्र upload
करावी लागणार आहेत .