अटल पेन्शन योजना
तुम्ही जर गुंतवणुकीसाठी सरकारी योजनेचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येथे आपण अटल पेन्शन योजनेची माहिती घेणार आहोत. अटल पेन्शन योजना ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्या मध्ये तुम्हाला दरमहा ५००० रुपये दिले जाणार आहेत.
अटल पेन्शन योजना ही एक सरकारी पेन्शन योजना आहे. या योजनेमध्ये १८ ते ४० वय वर्ष वयोगटातील भारतातील कोणतीही व्यक्ती सहभाग घेऊ शकते. या योजनेमध्ये व्यक्तीचे ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी १०००, २०००, ३०००, ४०००, आणि जास्तीत जास्त ५००० रुपये पेन्शन मिळते. दरमहा मिळणारी पेन्शन रक्कम तुम्ही दरमहा गुंतवणार्या रकमेवर अवलंबून असते.
या योजनेमध्ये तुम्ही एक ठराविक रकम दरमहा या योजने मध्ये गुंतवणूक करता. वयाच्या ६० वर्ष पर्यंत तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करता. ६० वर्यानंतर तुम्हाला ५००० रुपये पेन्शन दरमहा मिळते.