E-Shram Card registration - या सरकारी योजनेमध्ये 3000 रुपये मासिक मिळतात पण कसे? जाणून घेऊया पूर्ण माहितीई श्रम रजिस्ट्रेशन केल्यानंतर महिना तीन हजार रुपये मिळणार आहेत. पण कसे मिळणार? काय आहेत नियम आणि अटी ? याची संपूर्ण माहिती आपण माहिती घेणार आहोत,  पण या अगोदर ई श्रम नोंदणी काय आहे ते जाणून घेऊया?

श्रमिक कार्ड नोंदणी, हा भारत सरकार सरकारचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये देशातील सर्व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक लोकांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी झाल्यानंतर सर्व कामगारांना श्रम कार्ड मिळते. ई श्रम नोंदणी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारी योजना आणता याव्या आणि त्यांचा लाभ या लोकांना मिळावा यासाठी या श्रमिक लोकांची नोंदणी होत आहे.

श्रमिक कार्ड नोंदणी केल्यानंतर तीन हजार रुपये मिळणार पण कसे? 

ई श्रम नोंदणी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची होत आहे. या लोकांची संख्याही देशात जास्त आहे. उतारवयात जेव्हा हे लोक काम करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. त्यामुळे गरीब कामगारांना म्हातारपणी पेन्शन मिळावी. म्हणून सरकारने ही योजना आणली आहे. श्रम कार्ड नोंदणी केल्यानंतर वयाच्या साठीनंतर तीन हजार रुपये पेन्शन महिन्याला मिळणार आहे.


तीन हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी श्रम कार्डधारकांना फक्त पन्नास रुपये ते दोनशे रुपये एवढी वयानुसार रक्कम गुंतवावी लागते. आणि वयाच्या साठीनंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेला श्रम योगी मानधन योजना असे म्हणतात. ई श्रम नोंदणी केलेल्या लोकांना या योजनेमध्ये सहभागी होता येते. 


Post a Comment

Previous Post Next Post