पोस्टाच्या या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक आहे खूप फायदेशीर, जास्त व्याजदर याबरोबर मिळतील इतर अनेक फायदे


 

आताच्या आधुनिक युगात गुंतवणुकीसाठी अनेक मार्ग बाजारात आहेत. परंतु सर्व सामान्य लोक आजही भारतीय पोस्ट विभागामध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवतात. पोस्ट मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आज आपण अशाच पोस्टाच्या एका गुंतवणूक योजनेविषयी जाणून घेणार आहोत. 

पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हे या गुंतवणुकीचे नाव आहे. पब्लिक प्रोविडेंट फंड या योजनेला पीपीएफ असेही म्हटले जाते. पीपीएफ ही एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. मध्ये केलेले गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही गुंतवणूक सुरक्षित आहे. 


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी योजनेमध्ये केलेली गुंतवणूक खूप फायदेशीर असते. कारण या गुंतवणुकीवर व्याजदर चांगले मिळते. ही योजना दीर्घ मुदतीसाठी असल्यामुळे चक्रवाढ व्याज मिळते आणि मिळणारा परतावा चांगला येतो. पी पी एफ या योजनेत तुम्ही वार्षिक कमीत कमी पाचशे रुपये ते जास्तीत जास्त एक लाख 80 हजार रुपये गुंतवू शकता. यावर 7.1 टक्के दराने व्याज आकारले जाते. तुझसे खाते पंधरा वर्षानंतर मॅच्युरिटी होते. तुम्हाला सर्व रक्कम व्याजासहित मिळते. 


Post a Comment

Previous Post Next Post