कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे महाडीबीटी पोर्टल आहे या पोर्टल वर जाऊन शेतकरी सर्व योजनांसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला जर कडबा कुट्टी मशीन खरेदी करायचे असेल तर महाडीबीटी पोर्टल फार्मर या ऑप्शनवर जाऊन तेथ अर्ज करावा लागतो. या वेबसाईटवर आल्यानंतर सुरुवातीला शेतकऱ्यांना त्यांची माहिती भरावी लागते या नंतर अर्ज करा या ऑप्शनवर जाऊन घटक निवडा येथे मानव चलित यंत्र यामध्ये चाप कटर हे ऑप्शन निवडून अर्ज करावा लागतो यासाठी आपण महाडीबीटी पोर्टल फार्मर लिंक खाली दिले गेले आहे येथे जाऊन सर्वप्रथम शेतकऱ्यांचे प्रोफाइल बनवून नंतर घटक निवडून अर्ज करायचा आहे.