कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना
कृषी यांत्रिकरण उप अभियान योजना, या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदीवर 80% पर्यंत अनुदान सरकार देत आहे. शेतकऱ्यांनी कृषी यंत्रांचा वापर करावा आणि शेतीचे उत्पन्न वाढावे हा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व कृषी अवजारांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.
शासनाचे धोरण :-
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे. आणि शेतामध्ये कृषी यांत्रिकरण याचा वापर वाढवणे.
अनुदान
कृषी यांत्रिकरण उप अभियान या योजनेअंतर्गत सरकार कृषी यंत्रांच्या आणि अवजारांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेतून खालील दिलेल्या कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
- ट्रेक्टर
- पॉवर टिलर
- ट्रेक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
- मनुष्य चलित यंत्र यंत्र / अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र व अवजारे
- वैशिष्ट पूर्ण यंत्र आणि अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी यांना कृषी यंत्राच्या खरेदीसाठी ५०% अनुदान मिळते तसेच इतर सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या खरेदीसाठी ४०% अनुदान दिले जाते.
कृषी यंत्रीकरण उप-अभियान या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.