प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये सोलर पंप बसविण्यासाठी अनुदान दिले जाते. जाणून घेऊया या योजनेविषयी सर्व काही.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, म्हणून शेती करण्यातील अडचणी कमी व्हाव्या, शेती करणे सोपे व्हावे आणि शेकऱ्यांचे उतपन्न वाढावे यासाठी सरकार योजना आखात असत. सोलर पंप योजना ही अशीच एक योजना आहे.
शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी विहिरी मध्ये मोटार बसवली जाते, ही मोटार विजेवर चालत असल्याने शेतकऱ्यांना लाईट बिल भरावे लागते, त्यामुळे शेतीला खर्च जास्त होतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतामध्ये जर सोलर पंप बसविला तर पिकाला पाणी देताही येते परंतु याला कोणताही खर्च येत नाही परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना
सोलर पंप योजनेची पात्रता
1) ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत.
2) बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे.
3) ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
4) शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
कुसुम सोलार पंप योजनेचे ही आहेत वैशिष्ट्य
1) महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यास स्वखर्चाने इतर उपकरनेही त्याला जोडता येणार आहेत.
2) सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा हा लाभार्थी याचा राहणार आहे.
3) शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता
1) अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. 2) सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही. 3) अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो. 4) सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड 2) पासपोर्ट साईझ फोटो 3) रेशन कार्ड 4) नोंदणी प्रत 5) प्राधिकरण पत्र 6) जमीन प्रत 7) चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र 8) मोबाइल नंबर 9) बँक खाते विवरण
या योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे 👇
👇
👇
Tags:
Solar pump Yojana