प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अर्ज कसा करावा, पात्रता काय आहे, या बद्दल संपूर्ण माहिती.

 

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण 

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे.. ग्रामीण भागातील गरीब बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या कुटुंबाना पक्के घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य  देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी फक्त बेघर किंवा कच्चे घर असणारे दारिद्र रेषेखालील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो. या योजनेच्या लाभार्थ्याची निवड ग्रामपंचायती कडून केली. 

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा असावी अशा सर्वसाधारण अटी आहेत. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या व कायम प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटुंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.


घर बांधण्यासाठी किती आर्थिक सहाय्य मिळते. 

सन 2016 17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबवली जाणार आहे घरकुल बांधकाम करता साधारण क्षेत्रात रुपये एक लाख वीस हजार व नक्षलग्रस्त भागात करता रुपये एक लाख तीस हजार प्रति लाभार्थी अर्थसाहय्य देण्यात येणार आहे
 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेची अर्थसहाय्य राज्यस्तरीय बँक खात्यातून पीएफएमएस प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या बँक पोस्ट खात्यात जमा होणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2018 मधील लाभार्थ्यांच्या निवड करता वापरण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक साहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठित करण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्र वापरत उपलब्ध करून दिला जातो. 
प्रधानमंत्री आवास योजना वेबसाईट लिंक खाली दिली आहे. 

👇

👇

👇

प्रधानमंत्री आवास योजना - Apply Online


Post a Comment

Previous Post Next Post