नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक ६०००/- रुपयांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. आधार ई-केवायसी म्हणजेच सोप्या भाषेत आधार पडताळणी. ई-केवयासी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पुढील २००० रुपयांचा हप्ता मिळणार नाही. ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत शासनाने ३१ मार्च २०२२ ही दिली आहे.
पीएम किसान ई-केवायसी म्हणजे काय ?
पीएम किसान सन्मान योजना ही योजना शासनाने शेकऱ्यांसाठी आणलेली आहे. या योजने अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शासन वार्षिक ६०००/- रुपये देते. हे ६०००/- रुपये शासन २०००/- रुपयांच्या तीन हपत्यामध्ये देते. प्रत्येक चार महिनानंतर २०००/- रुपये असे वर्षाला ६०००/- रुपये देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दिले जातात. या योजनेमध्ये गैरव्यवहार होऊ नये आणि पात्र शेतकऱ्यांनाच पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांची पडताळणी होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आधार ई- केवायसी ही एक पद्धत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आधारकार्डची पडताळणी होणार आहे.
पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ?
पीएम किसान ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत आपण येथे पाहणार आहोत. ई-केवयासी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक जवळच्या आधार सेंटर वर जाऊन लिंक करू शकता. मोबाईल नंबर आधार ला लिंक झाल्यानंतर तुम्ही पुढील स्टेप करून ई- केवायसी सहजपने मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर करून घेऊ शकता.
आधार ई केवायसी करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
👇👇