PM Kisan Tractor Yojana Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना आणत आहे. यामध्ये पी एम किसान ट्रॅक्टर योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते, या योजनेची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
शेती या व्यवसायामध्ये ट्रॅक्टर हे सर्व कामांसाठी महत्त्वाचे यंत्र आहे. नांगरणी पासून ते मालवाहतुकीसाठी याचा मोठा वापर होतो. सध्याच्या आधुनिक युगामध्ये शेतीच्या सर्वच कामांमध्ये ट्रॅक्टरचा वापर होत असतो. शेतकऱ्यांना जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर केंद्र सरकार त्यासाठी मोठी सबसिडी देत आहे.
शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यंत आवश्यक आहे पण आपल्या देशामध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ट्रॅक्टर घेणे शक्य होत नाही म्हणून केंद्र सरकार पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्टर दिले जातात.
आवश्यक कागदपत्रे-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, शेतीचा सातबारा आणि खाते उतारा, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
अर्ज कसा करावा
पी एम किसान ट्रॅक्टर योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता. या योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत. फक्त तुम्ही ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकता.
खाली अधिकृत वेबसाइटची लिंक दिली आहे.👇
👇
👉 येथे अर्ज करा 👈