प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना
आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना चालवली जाते. या योजेनेमध्ये शेतकऱ्यांना ६०००/- रुपये वार्षिक दिले जातात. मित्रांनो तुम्हीही या योजनेचे लाभ धारक असल्यास तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजना लाभ धारकांना आता आधार ई केवायसी करणे बंधन कारक झाले आहे. यामुळे अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. देशामध्ये गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने पीएम किसान योजना चालू केली आहे. परंतु अनेक शेतकरी जे या योजनेस पत्र नाहीत त्यांनीही या योजनेचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला.
👇
लाखो अपात्र शेतकऱ्यांनी २-२ हजार रुपयांचे अनेक हप्ते मिळवले आहेत. काही ठिकाणी प्राप्तीकर भरण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवला आहे, तर काही ठिकाणी पती- पत्नी दोघेही सरकारी पैसे घेत आहेत. शेती पती- पत्नीच्या नावावर असली, ते एकत्र राहत असणार आहे, आणि कुटुंबातील मुले अल्पवयीन असतील तर या योजनेचा लाभ फक्त एका व्यक्तीलाच मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असून देखील काही शेतकरी जोडप्यांनी खोटी कागदपत्रं जमा करून किसान योजनेतील पैसे मिळवले आहेत.
👇
शेळी, मेंढी, कुकुटपालन योजना 25 लाखापर्यंत अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु.
पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होईल त्या अगोदर पी एम किसान केवायसी करणे बंधनकारक आहे.