Pm Kisan Yojana Updates
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पी एम किसान योजना या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. ही योजना 2019 मध्ये चालू करण्यात आली होती. परंतु काही अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा फायदा घेण्यास सुरुवात केली म्हणून अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी पी एम किसान केवायसी करणे शासनाने बंधन कारक केले आहे. पी एम किसान केवायसी करण्याची मुदत सुरुवातीला 31 मार्च ही देण्यात आली होती. आता 31 मार्च जवळ आल्याने सर्व शेतकरी केवायसी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु तांत्रिक अडचणींमुळे केवायसी करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील दोन हजार रुपये चा हप्ता मिळेल की नाही याची काळजी लागली आहे.
पी एम किसान योजना ई-केवायसी करण्याची मुदत
पी एम किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. केवायसी करण्यासाठी सुरुवातीला 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु आता ती वाढवून 31मे करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे म्हणून शासनाने ई-केवायसी करण्याची अखेरची तारीख 31 मे ही केली आहे.
पीएम किसान योजना ई केवयासी लिंक
पीएम किसान योजना ई-केवयासी करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ई-केवयासी करू शकता. ई- केवयासी स्वतः करण्यासाठी आधार आणि मोबाइल नंबर लिंक असावा लागता. आणि जर लिंक नसेल तर तुम्ही महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन ई- केवयासी करू शकता.
ई-केवयासी करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
👇
👇