सरकार देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी अनेक योजना आणत आहे. यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक आहे या योजनेमध्ये महिलांना पाच हजार रुपये दिले जातात. या योजनेत आता मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला आहे. येथे आपण या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.
देशातील गरोदर महिला आणि स्तनदा महिला यांची काळजी घेता यावी यासाठी सरकार या महिलांना पाच हजार रुपये देते. या योजनेअंतर्गत गरोदरपणात आणि स्तनपान करण्याच्या काळात महिलांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 5000/- रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात येते.
झालेला बदल
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत महिलांना गरोदरपणात आणि स्तनपान करावयाच्या कालावधीत त्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये रोख दिले जातात. ही योजना फक्त पहिला मुलाच्या जन्माच्या वेळी लागू होते. आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतरही महिलांना पाच हजार रुपये मिळणार आहेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची नोंदणी कशी करावी
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या सरकारी दवाखाना मध्ये जाऊन नोंदणी करू शकता. याबाबत सर्व माहिती सरकारी दवाखान्यातील आशा सेविका देतात. गरोदर पणात आणि बाळ झाल्यानंतर सर्व काळजी सरकार घेते यासाठी आशा सेविकांची नेमणूक करण्यात येते. आशा सेविका तुम्हाला याबाबत सर्व मार्गदर्शन करतील.