सरकारी योजनांचे सर्वसामान्य लोकांना लाभ घेता यावा यासाठी सरकारने काही मोबाईल ॲप बनवले आहेत यांची आज आपण माहिती घेणार आहोत.
भारत सरकार द्वारे अनेक वेगवेगळ्या कामांसाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ॲप मोफत आहेत आपण गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून त्यांचा उपयोग करू शकतो. पुढे काही महत्त्वाच्या मोबाईल विषयी माहिती देण्यात आली आहे.
M Aadhar आणि My Gov
यूआयडीएआयद्वारे जारी केले जाणारे M Aadhaar हे खूपच कामाचे अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळतात. तुम्ही आधार कार्डला डिजिटल फॉर्मेटमध्ये सेव्ह करू शकता. तसेच, बायोमेट्रिक माहिती देखील सुरक्षित ठेवता येईल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड देखील दाखवू शकता. तसेच, My Gov अॅप देखील तुमच्या फोनमध्ये असायलाच हवे. याद्वारे तुम्ही सरकारी विभाग आणि मंत्रालयाने सुचना देवू शकता. कोणत्या योजनेवर तुमची कल्पना देखील सरकारला सुचवू शकता. हे अॅप देखील मोफत उपलब्ध आहे.
mPARIWAHAN आणि UMANG
या अॅपमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिजिटल कॉपी म्हणून सेव्ह करू शकता. या डिजिटल कॉपीला कायदेशीर मान्यता आहे. या अॅपच्या माध्यमातून सेकंड हँड गाडीची माहिती देखील तपासू शकता. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास UMANG अॅप तुमच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अॅपच्या माध्यमातून EPF, पॅन, आधार, डिजिलॉकर, गॅस बुकिंग, मोबाइल बिल पेमेंट आणि वीज बिल पेमेंट इत्यादी सेवांचा लाभ मिळेल. या अॅपला मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि नॅशनल ई-गव्हर्नेंस डिव्हिजनने मिळून तयार केले आहे.
DigiLocker
DigiLocker हे असे अॅप आहे, जे प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अॅपची साइज ७.२ एमबी आहे. तुम्ही या अॅपमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्डला डिजिटल फॉर्मेटमध्ये सेव्ह करू शकता. यात तुम्ही आपल्या कॉलेजचे सर्टिफिकेट देखील सेव्ह करू शकता. यामुळे महत्त्वाची कागदपत्रं हार्ड कॉपी स्वरूपात नेहमी सोबत बाळगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, हे सर्व अॅप्स तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.