सुकन्या समृद्धी योजना अटी आणि शर्ती
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी योजना आहे. दहा वर्षाखालील मुली या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. एका कुटुंबातील दोन मुली या योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजना चे खाते पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडता येते. या योजनेसाठी मुलींचे बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, त्यांचे पालकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये कमीत कमी 250 रुपये वार्षिक गुंतून खाते सुरु करता येते. या खात्यामध्ये दीड लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त रक्कम गुंतवता येते.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते. या खात्याची मुदत पंधरा वर्षे एवढे असते.
सुकन्या समृद्धी योजना फायदे
सुकन्या समृद्धी योजना हे मुलींच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर योजना आहे. मुलींच्या पालकांना शिक्षण आणि लग्न या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होते.
मुलींच्या भविष्यासाठी मोठी रक्कम बनते.
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर खूप चांगले आहे. वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळते. चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असल्याने रक्कम परतावा चांगला मिळतो. यावर टॅक्स बेनिफिट्स मिळतात. इतर गुंतवणूक प्रकारापेक्षा सुकन्या समृद्धी योजना मध्ये केलेली गुंतवणूक ही मोठा परतावा मिळवून देते.
Tags:
Sukanya samriddhi Yojana