ठिबक सिंचन योजना
शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करता यावा आणि शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्र सरकार कृषी सिंचनाला नेहमी पाठिंबा देत असते. सध्या ठिबक सिंचन शेतीमध्ये बसवण्यासाठी कृषी सिंचन योजनेमधून 80 टक्के अनुदान मिळत आहे याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत.
ठिबक सिंचन
शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर व्हावा, आणि पिकाला पुरेसे पाणी मिळून शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी झाडाच्या मुळाला थेंबाथेंबाने पाणी देण्याच्या तंत्रज्ञानाला ठिबक सिंचन असे म्हणतात. ठिबक सिंचना मध्ये पाइपद्वारे शेतामधील प्रत्येक रोपाला थेंबाथेंबाने योग्य प्रमाणात पाणी दिले जाते त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढते. प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये ठिबक सिंचन बसवता यावे यासाठी सरकार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेमध्ये सरकार शेतीमध्ये कृषी सिंचन बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी सध्या 80 टक्के अनुदान आहे. कृषी सिंचन योजनेमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन हे दोन सिंचन प्रकार आहेत. शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना साठी अर्ज कसा करावा याची माहिती आपण येथे घेणार आहोत.
अर्ज कसा करावा
ठिबक सिंचन 80 टक्के अनुदानावर घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो येथे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होते शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रे अपलोड करावे लागतात यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येतो.
अर्ज करण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
👇
👇
👉 महाडीबीटी 👈
सध्या ठिबक सिंचनासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
अशीच उपयोगी माहिती घेण्यासाठी majhiyojana.in या वेबसाईटला रोज भेट द्या.