राज्य कृषी यांत्रिकरण योजना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित औजारे, यांसाठी शासकीय अनुदान, जाणून घ्या या योजनेविषयी


नमस्कार मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे, यामध्ये कृषी यांत्रिकरण हि एक योजना आहे. कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते. कृषी  योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित औजारे तसेच इतर कृषी औजारासाठी अनुदान जाते.

राज्य कृषी यांत्रिकरण योजनेविषयी महत्वाचे  मुद्दे.

१. या  योजनेचा उद्देश अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण याचा लाभ पोहोचवणे हा आहे.

२. या योजने अंतर्गत ट्रॅक्टर, पावर / टिलर ट्रॅक्टर चलीत अवजारे, बैलचलित यंत्र/ अवजारे, मनुष्य चलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, फुल उत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे अवजारे, स्वयंचलित यंत्रे या कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते.

३. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल व अर्ज करावा लागतो.

पात्रता

 •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
 •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
 •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
 •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
 • उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

आवश्यक कागदपत्रे

 •  आधार कार्ड
 •  ७/१२ उतारा
 •  ८ अ दाखला
 •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
 •  स्वयं घोषणापत्र
 •  पूर्वसंमती पत्र

या योज़नेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत वेबसाईट  दिली आहे. 
👇👇👇👇Post a Comment

Previous Post Next Post