नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती घेणार आहोत. ही राज्य सरकारची योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये पर्यंत वैद्यकीय उपचार मोफत मिळतो.
Mahatma fule Jan aarogya Yojana
महात्मा फुले जन आरोग्य योजना
या योजनेद्वारे पात्र लाभार्थी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. परंतु लाभ घेण्यासाठी या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. म्हणून आपण येथे या योजनेचे माहिती घेत आहोत.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश
राज्यातील जनतेला गंभीर आजारावरील उपचारासाठी पूर्णपणे निशुल्क आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना चालू करण्यात आले आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवले जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते म्हणजेच दीड लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कोणासाठी आहे
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणारे केशरी शिधापत्रिका धारक, या योजनेसाठी पात्र आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?
महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी रूगलयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते
योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत आरोग्यमित्र रुग्णांची योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ते सहाय्य व मदत करतात. रुग्णांची नोंदणी आरोग्यमित्र मार्फत केली जाते.