![]() |
majhi kanya bhagyashri yojana |
माझी कन्या भाग्यश्री योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींसाठी राबवण्यात येणारी योजना आहे या योजनेमध्ये सरकार मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँक मध्ये मुदत ठेव स्वरूपात ठेवते आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर हे सर्व व्याजासहित रक्कम मुलीला मिळतात. या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आपण येथे घेणार आहोत.
माझी कन्या भाग्यश्री योजना कोणासाठी आहे?
👇👇👇
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
मुलीचा जन्म दाखला
पासपोर्ट साईज फोटो
अर्ज कसा करावा
सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविकाही मार्गदर्शन करू शकतील.
या योजने बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुका स्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागतो.