Majhi Kanya bhagyashri Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये मुलीच्या नावावर मिळतात पन्नास हजार रुपये, वाचा सविस्तर माहितीमाझी कन्या भाग्यश्री योजना 

माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींसाठी राबवली जाणार योजना आहे. या योजनेमध्ये मुलीच्या भवितव्यासाठी तिच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये मुदत ठेव स्वरूपात शासन ठेवते. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला या योजनेची व्याजासहित संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेच्या काही अटी आणि शर्ती आहेत यांची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत.

माझी कन्या भाग्यश्री योजना अटी आणि शर्ती

  • मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे
  • कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • कुटुंबात एक मुलगी असेल तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
  • ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.5 लाख यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज करण्यासाठी
👇👇👇Post a Comment

Previous Post Next Post