पिक कर्ज योजना शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळणार

 

पिक कर्ज योजना महाराष्ट्र 2022 

शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याज दराने

नमस्कार, आज आपण येथे शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या पिक कर्ज योजनेची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.


शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना 

👇👇👇 

येथे क्लिक करा.






डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नुसार एक लाख रुपये पर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते तर 1 ते 3 लाख पर्यंत च्या कर्जासाठी एक टक्का व्याज सवलत दिली जाते आता एक ते तीन लाख पर्यंत कर्ज फेडण्यास आणखी दोन टक्के व्याज दरात सवलत मिळणार आहे.

मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर सरसकट तीन टक्के व्याज सवलत राज्य शासनातर्फे मिळेल केंद्र शासनातर्फे तीन लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत पीक कर्ज मुदतीत भेटल्यास तीन टक्के व्याज सवलत मिळेल. सन 2021 22 पासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज मुदतीत फेडल्यास 6 टक्के व्याज सवलत मिळवून सदरचे पीक कर्ज शुन्य व्याज दराने उपलब्ध होणार आहे.






Post a Comment

Previous Post Next Post