प्रधानमंत्री जन धन खाते.
पीएम जन धन बँक खाते ही सरकारची एक खास योजना आहे. सर्वसामान्य जनतेला बँकिंग सुविधांचा लाभ घेता यावा हा या योजनेमागील उद्देश आहे. पीएम जन धन बँक खाते उघडल्यास लोकांना १००००/- रुपयांपर्यंत overdraft ची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच त्यांच्या बँक खात्यामध्ये शिल्लक नसेल तरी त्यांना १००००/- रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. छोट्या मोठ्या गरजांसाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे. पीएम जन धन खात्याचे अनेक फायदे आहेत यांची माहिती आपण घेणार आहोत.
प्रधानमंत्री जन धन बँक खाते उघडण्याचे फायदे
1. प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत बँक खाते उघडल्यास तुम्हाला बँक खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची सक्ती केली जात नाही.
२. या योजनेंतर्गत खाते उघडल्यास, रूपे ATM कार्ड मिळते.
३. या योजने अंतर्गत बँक खाते उघडल्यास २ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण आणि ३००००/- रुपयांचे जीवन संरक्षण मिळते.
४. हे खाते मोफत उघडून दिले जाते.
5. या खात्यावर तुम्हाला १००००/- रुपयांचे overdraft ची सुविधा मिळते.
👇👇👇
प्रधानमंत्री जन धन खाते कसे उघडावे
प्रधानमंत्री जन धन खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट साईझ फोटो या प्रकारे कागदपत्रे लागतात. जन धन खाते तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेमध्ये काढू शकता. तुमचे अगोदर एकादे बँक खाते असल्यास त्याचे रुपांतर तुम्ही जन धन बँक खात्यामध्ये करू शकता.