कोरोना काळात अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना अन्न मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने मोफत धान्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ लोकांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत घेतला आहे. अजूनही लोकांना आर्थिक अडचणी आणि महागाई चा सामना करावा लागत आहे म्हणून सरकारने सप्टेंबर २०२२ पर्यंत गोरगरिबांना रेशनवर मोफत धान्य देण्याचे ठरवले आहे.
आता सप्टेंबर २०२२ पर्यंत मिळेल मोफत धन्य
20 मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने ही योजना चालू केली होती. सर्वप्रथम जून 2020 पर्यंत गोरगरिबांना रेशन दुकानावर मोफत धान्य मिळाले. त्यानंतर वेळोवेळी केंद्राने या योजनेला मुदतवाढ दिली. आता कोरोनाच्याच्या तिसऱ्या लाटे नंतरही या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे. आता सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेली मोफत धान्य देण्याची पीएमजीकेवाय योजना ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली सुरू करण्यात आली. त्यानुसार प्रति किलोग्रॅम 2 ते 3 रुपये अशा अनुदानित दराने धान्य पुरवले जाते.