पौष्टिक तांदूळ वाटपाचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सर्व सरकारी योजनांमध्ये पौष्टिक तांदूळ वितरित करण्याच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राच्या निर्णयानंतर आता सार्वजनिक वितरण प्रणाली आणि इतर योजना अंतर्गत पौष्टिक तांदुळाचे वितरण तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला याबाबत पुरवठा आणि वितरणासाठी भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य संस्थांनी आधीच पौष्टिक तांदूळ खरेदी केल्या आहेत.
पुढे अनुराग ठाकूर म्हणाले की लक्षित सार्वजनिक वितरित प्रणालीच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच या योजनेवर दरवर्षी 2700 कोटी रुपये खर्च केले जातील. याचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.