शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईल वर कसा पाहायचा
नमस्कार शेतकरी मित्रांन्नो, आज आम्ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा नकाशा पाहण्याची गरज भासते आज आपण ऑनलाईन पद्धतीने शेतीचा नकाशा कसा पाहायचा ते शोप्या शब्दात समजून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो शेतीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहता येतो आणि तो ही संपूर्ण मोफत पद्धतीने म्हणजे नकाशा पाहण्यासाठी पैसे जात नाहीत. येथे आम्ही काही स्टेप्स देत आहोत त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी शेत जमिनीचा नकाशा पाहावा.
1. सर्वात आधी गुगल वर Bhunaksha अस टाईप करून शोधावे
२. सर्च केल्यानंतर गुगल वर https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp ही वेबसाईट येईल त्यावर क्लिक करून शेत जमिनीचा नकाशा पाहता येतो.
३. या वेबसाईट वर आल्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागते.
४. गाव निवडल्यावर तुमच्या शेत जमिनीचा गट नंबर टाकून सर्च करावे यानंतर त्या शेतजमिनीचा नकाशा पाहायला येतो.
👇👇👇
शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.