श्रावणबाळ योजना, या योजनेमध्ये वृद्ध लोकांना मिळते मासिक पेन्शन जाणून घेवूया या योजनेविषयीश्रावण बाळ सेवानवृत्ती योजना ही योजना समाजातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाते. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत केली जाते. ही योजना 65 वर्षाच्या पुढील सर्व निराधार लोकांसाठी आहे.

👇
श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना कोणासाठी आहे.

65 वर्षाच्या पुढील निराधार लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात. तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाचे यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. 

मिळणारा लाभ 

लाभार्थींना या योजनेतून दरमहा 400 रुपये अर्थसाह्य दिले जाते याच लाभार्थ्यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतून 200 रुपये दिले जातात दोन्ही मिळून सहाशे रुपये निवृत्ती वेतन मिळते. 

👇कागदपत्रे 

वयाचा दाखला
हायातीचा दाखला
रेषेखालील कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा अगर दाखला
आधारशी संलग्न बँक खाते
वार्षिक उत्पन्न 21 हजार पेक्षा कमी असल्याचा दाखला.

👇

👉 अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा.  ✔️


Post a Comment

Previous Post Next Post