श्रावण बाळ सेवानवृत्ती योजना समाजातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाते. निराधार ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाहासाठी थोडी मदत व्हावी या उद्देशाने शासनाने ही योजना आणली आहे. ही योजना 65 वर्षाच्या पुढील सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आहे या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सहाशे रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेची माहिती आपण घेणार आहोत.
श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचा अर्ज तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा नागरी सुविधा केंद्र या कार्यालयामध्ये जाऊन करावा लागतो.