![]() |
Thibak-Sinchan-Yojana |
कृषी सिंचन योजना - ठिबक सिंचन
शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्यासाठी ठिबक सिंचन या कृषी सिंचनाचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांनीही आता ठिबक सिंचनाचे महत्त्व पटले आहे. सरकार हे शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवण्यासाठी आर्थिक साहाय्य देते. सरकार शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे यासाठी महाडीबीटी पोर्टल वर शेतकर्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.
👇👇👇
ठिबक सिंचन शेतीमध्ये बसवण्यासाठी सरकार 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. शेतकरी मित्रांनो, या योजनेची सर्व या ऑनलाईन पद्धतीने होते त्यामुळे सरकारी कार्यालयात हेलपाटे घालावे लागत नाहीत.
ठिबक सिंचन ऑनलाइन अर्ज कसा करावा
👉ठिबक सिंचन 90 टक्के अनुदान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वर लिंक दिली होती त्यावर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जाल यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवायचे आहे
👉प्रोफाईल मध्ये वैयक्तिक माहिती शेतीची माहिती आणि पिकाची माहिती टाकल्यानंतर तुम्हाला सिंचन स्त्रोत म्हणजेच पाण्याचा स्त्रोत काय आहे याची माहिती टाकावी लागते
👉ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येतो अर्ज करण्यासाठी कृषी सिंचन योजना यामध्ये ठिबक सिंचन या घटकाची निवड करून अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी नेट कॅफे मध्ये जाऊन त्या लोकांची मदत घेऊन अर्ज करावा.