कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022, असा करा अर्ज



 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी खरेदी करायचे आहे त्या शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे त्यांना पन्नास टक्के अनुदानावर कडबाकुट्टी खरेदी करता येणार आहे. या विषयी सर्व माहिती आपण या लेखामध्ये घेत आहोत.



कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 चालू झाले आहे या योजनेसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. महाराष्ट्र सरकार कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे. या योजनेचे अनुदान 50% किंवा दहा हजार रुपये एवढे असेल.



कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करावा लागतो. सर्व प्रथम शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर आपले प्रोफाईल बनवावे लागते येथे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, पिकाची माहिती द्यावी लागते नंतर अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या खरेदीसाठी आर्थिक साहाय्य ही बाब निवडावे. यानंतर मनुष्य चलित अवजारांमध्ये कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करता येतो.


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post